रिचर्ड पी. फाईनमन - लेख सूची

अज्ञाताचे दार

मला शंका, अनिश्चितता, अज्ञान सहन करत जगता येते. एखादी गोष्ट माहीत नसताना जगणे हे चुकीच्या उत्तरांसोबत जगण्यापेक्षा जास्त रंजक आहे. ही एक बाब मान्य करा आपण प्रगती करत असतानाच खात्री नसणेही सोबत येईल; पर्याय सुचण्याच्या, शोधण्याच्या संधीही येतील, (मग) आपण आजचे तथ्य, आजचे ज्ञान, आजचे केवल सत्य, यांबाबत फार उत्साही असणार नाही, प्रगती साधायला अज्ञाताचे …

शंका असणे-खात्री नसणे

आपण कोण आहोत? कुठे चाललो आहोत? ह्या विश्वाचा अर्थ काय? ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्र न आहे, नाही का? पण असो. तुम्ही …

नीतीला धर्माकडून प्रेरणा कशी मिळत राहील?

[रिचर्ड पी. फाईनमन हा या शतकातला एक अग्रगण्य भौतिकीतज्ज्ञ. विज्ञानाची चुकतमाकत, तात्पुरती मते बनवत, थोड्याशाच पण अत्यंत भरवशाच्या ज्ञानाकडे जाणारी पद्धत वारंवार इतर अ-वैज्ञानिकांसमोर मांडण्यासाठीही त्याची ख्याती. या पद्धतीवरच्या आग्रहानेच सतत ‘हे मला माहीत नाही’, ‘हे मला समजायला अवघड वाटते’, असे तो म्हणतो — सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे …